🚩 ३१ जुलै १६५७ – मराठा आरमाराची दिव्य सुरुवात!
"ज्याचं आरमार, त्याचं दर्यावर स्वार!" – हे तत्वज्ञान शिवाजी महाराजांनी १७व्या शतकात ठामपणे अंगीकारलं आणि हिंदवी स्वराज्याच्या समुद्रसत्तेची पायाभरणी केली.
🔱 दर्यास स्वराज्याचा पालखिंड!
शिवकालीन बखरकार सभासद कृष्णाजी अनंत हिरेपारखी यांनी एक आगळी नोंद केली आहे:
“पानियातील डोंगर वसवून दर्यामधे गड वसविले, गड जहाजे मिळवून दर्यास पालाण राजियानी घातले. जोवर पानियातले गड असतील, तोवर आपले नाव चालेल.”
शिवाजी महाराजांनी या विचाराचं मूर्त रूप दिलं. जावळी, उत्तर कोकण, कल्याण, भिवंडी, चौल, माहुली आणि रत्नागिरी इथपर्यंत त्यांनी आपल्या सामर्थ्याचा विस्तार केला होता. आता लक्ष होतं – सिद्दीच्या अजिंक्य जलदुर्ग जंजीऱ्यावर!
⚔️ जंजीऱ्याची पहिली ठिणगी – ३१ जुलै १६५७
शिवाजी महाराजांनी जंजीर्यावर मोहिम हाती घेण्याचे आदेश रघुनाथपंत बल्लाळ कोकणे यांना दिले.
➤ ३१ जुलै १६५७ – पंतांनी दंडा-राजपुरी काबीज केले आणि लगेच जंजीर्यावर दबाव निर्माण केला.
सिद्दीने थोडक्याच वेळात तहाच्या बोलणी सुरू केली – पण ही फक्त एक सुरूवात होती!
🛡️ शिवरायांचा कोकणात धडका प्रवेश
● ३ ऑक्टोबर १६५७ – शिवाजी महाराज कल्याणात दाखल
● २४ ऑक्टोबर – कल्याण-भिवंडी एकाच दिवशी जिंकले
● २८ नोव्हेंबर १६५७ – चौल काबीज
● माहुली, खारेपाटण, रत्नागिरीसारखी ठाणीही स्वराज्यात आली
🏰 विजयदुर्ग – एक नाम आणि एक निर्धार
घेरियाचा किल्ला काबीज होताच त्याचं "विजयदुर्ग" असं स्फूर्तीदायक नामकरण महाराजांनी केलं.
त्यानंतर सुरू झालं त्याचं बळकटीकरण – जे पुढे मराठा आरमाराचा बालेकिल्ला ठरलं.
🛶 “संगमिरी” तारव्यांची निर्मिती – मराठा आरमाराची पहिली झेप
कल्याण-भिवंडी-पनवेल या प्रदेशात मुबलक सागवान लाकूड उपलब्ध होतं. याचा वापर करून आरमारी तारव्यांची निर्मिती सुरू झाली.
महाराजांनी आधीच जाहीर केलं की,
"या तारवा पोर्तुगीजांवर नव्हे, सिद्दीवर वापरणार आहोत!"
त्यामुळे तत्कालीन वसईत असणाऱ्या पोर्तुगीज जहाजकारागिरांकडून (विशेषतः रुय व्हिएगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हिएगस) मदतीनं, महाराजांनी पहिल्या २० संगमिरी नावाच्या तारवा बनवून घेतल्या.
📜 ऐतिहासिक महत्त्व
मराठा आरमाराची ही पहिली पायरी म्हणजे केवळ सैनिकी शक्ती नव्हे, तर एक संपूर्ण सागरी धोरण होती – ज्याने पुढे इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्याविरुद्ध मराठ्यांना महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिलं.
.png)
.png)
